Share

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! अशाप्रकारे जोडता येणार Social Media प्रोफाइलची लिंक

WhatsApp Beta tests any new feature before releasing it. After the testing is complete, WhatsApp releases the new feature to all its users.

by MHD

Published On: 

Whatsapp rolling out feature to add social media profile links

🕒 1 min read

WhatsApp । सगळ्यात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप सतत आपल्या युजर्ससाठी (WhatsApp users) नवनवीन फीचर्स (New WhatsApp Features) लाँच करत असते. यामुळे युजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षितता देखील वाढते. हे लक्षात घ्या की व्हॉट्सअ‍ॅप बीटा कोणतेही नवीन फीचर रिलीज करण्यापूर्वी त्याची चाचणी घेत असते.

चाचणी पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप आपल्या सर्व युजर्ससाठी नवीन फीचर्स जारी करते. अशातच आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक शानदार फिचर आणले आहे. ज्यामुळे युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइलमध्ये (WhatsApp profile) इतर सोशल मीडिया प्रोफाइल (Social media profiles) जोडता येईल.

हे लक्षात घ्या की युजर्सना त्यांच्या प्रोफाइलमध्ये दुसर्‍या सोशल मीडिया हँडलचे नाव लिहावे लागणार आहे. यानंतर आपोआप एक लिंक तयार होईल. येथून इतर युजर्स थेट तुमच्या त्या प्रोफाइलशी कनेक्ट होऊ शकतात.

हा पर्याय फक्त इंस्टाग्रामसाठी उपलब्ध आहे. आगामी अपडेटमध्ये हा पर्याय फेसबुकसह इतर प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध होईल. या फीचरमध्ये प्रोफाइलची दृश्यमानता सेट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप पर्याय देत आहे.

Latest WhatsApp Features for Users

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप अनेक नवीन टूल्सची टेस्टिंग करत आहे. आता एकापाठोपाठ एक नवनवीन फीचर्स आपल्या युजर्ससाठी रोल आउट करत आहे. लवकरच हे नवीन फिचर युजर्ससाठी उपलब्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!