IPL 2025 । सर्व संघांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18 व्या हंगामासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांवर आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.
पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे. या हंगामात एकूण पाच संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात संघ कशाप्रकारे कामगिरी करेल? याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वासह चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (IPL 2025 team captains)
22 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघानी आगामी हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधारांची घोषणा केली आहे.
List of captains of 10 teams in IPL
1- दिल्ली कॅपिटल्स- अक्षर पटेल
2- सनराइजर्स हैद्राबाद- पैट कमिंस
3- रॉयल चैलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
4- राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
5- पंजाब किंग्स- श्रेयस अय्यर
6- लखनऊ सुपर जायंट्स- ऋषभ पंत
7- मुंबई इंडियन्स- हार्दिक पांड्या
8- कोलकाता नाइट राइडर्स- अजिंक्य रहाणे
9- गुजरात टायटन्स- शुभमन गिल
10- चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड
दरम्यान, आयपीएल 2025 चा उद्घाटन समारंभ कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार यावेळी बॉलीवूडचे अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत. हा उद्घाटन समारंभ 22 मार्च रोजी रात्री 6 वाजता सुरु होणार आहे.
18th season of IPL begins from March 22
तसेच आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होणार आहे. नाणेफेक अर्ध्या तासापूर्वी म्हणजेच 7 वाजता होईल. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआर मैदानात उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या :