Share

नाराजीच्या चर्चांवर Jayant Patil यांचं मोठं विधान, म्हणाले; “पक्षाच्या हिताचा निर्णय…”

by MHD
Jayant Patil reaction on talk of joining other party

Jayant Patil । शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मागील काही दिवसांपासून नाराज असून ते लवकरच भाजप किंवा अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलताना माझं काही खरं नाही असं विधान केले होते.

त्यामुळे ते पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अशातच आज त्यांनी बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नाराजीच्या चर्चांवर उत्तर दिले आहे. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

“मी नाराज वैगरे काही नाही. तशीही मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे. शक्तीपीठ रस्त्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्यांच्यासमोर भाषण करताना मी ते म्हणालो होतो. राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हे आंदोलन हातात घेतल म्हटल्यावर काही विषय नाही. आंदोलनाला पाठिंबा असल्याची भावना होती,” असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.

पुढे ते म्हणाले की, “माझ्या भाषणातून मी नाराज आहे आणि पक्ष बदलणार असे बोलले जात आहे. एका तासामध्ये मी त्यावर स्पष्टीकरण दिले. माध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की मला कुठेतरी ढकलायचं. जो काही पक्षाच्या हिताचा निर्णय आहे, तो आम्ही एकत्रित मिळून घेऊ,” असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil statement on joining other party

“आम्ही एका कुटुंबातील सर्वजण आहोत, आम्ही कुणाला इशारा देणार नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे. मी इकडे जाणार तिकडे जाणार हा विषय होऊ शकत नाही,” असेदेखील जयंत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

Jayant Patil met Sharad Pawar today. At that time, he responded to the discussions of displeasure.

Politics Maharashtra Marathi News