Share

मोदी, शाह, सोनिया, राहुल एकाच मंचावर! रेवती सुळेच्या रिसेप्शनने वेधलं देशाचं लक्ष

रेवती सुळेच्या रिसेप्शनला PM मोदी, अमित शाह, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित राहिल्याने शरद पवार आणि मोदी यांच्यातील संवाद चर्चेचा विषय ठरला.

Published On: 

PM Modi and Sharad Pawar at Revati Sule reception

दिल्ली : सकाळी शरद पवार (Sharad Pawar) गटातील आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांची भेट घेतली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर तर्कवितर्क लढवले गेले. दरम्यान, त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीत सुप्रिया सुळे (Supriya sule) यांची कन्या रेवती सुळे (Rewati Sule) आणि सारंग लखानी यांच्या विवाहानिमित्त स्वागत समारंभ (रिसेप्शन) आयोजित करण्यात आला होता.

या समारंभाला अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी या कार्यक्रमास उपस्थित होते. राहुल गांधी आणि अमित शहा एकाच वेळी या ठिकाणी पोहोचले.

PM Modi and Sharad Pawar at Revati Sule reception

अमित शहा जेव्हा मंचावर आले, तेव्हा राहुल गांधी आणि सोनिया गांधी खालीच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात २० मिनिटे थांबले. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकमेकांच्या बाजूला बसले होते आणि त्यांनी काही काळ चर्चा केली.

सुप्रिया सुळे यांच्या पूर्ण कुटुंबासोबत फोटो काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले. अमित शहा आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली आणि शहा यांनी पवारांच्या शेजारी जाऊन बसले.

सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या स्वागत समारंभाला अनेक प्रमुख राजकीय व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. यापूर्वी विवाह सोहळा मुंबईत पार पडला होता आणि त्यानंतर दिल्लीत हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही