Trupti Desai । भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांकडून नोटीस (Notice to Trupti Desai) पाठवण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
वाल्मिक कराड (Walmik Karad) पोलिसांना शरण आला त्यावेळी तृप्ती देसाई यांनी बीड पोलिसांवर निशाणा साधला होता. वाल्मिक कराड याने त्याच्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन त्यांना बीडमध्ये आणले. काही पोलिस अधिकारी कराडसाठी काम करत आहेत, असे म्हणत त्यांनी 26 पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी दिली होती.
हेच प्रकरण तृप्ती देसाई यांच्या अंगलट आले आहे. तृप्ती देसाई यांनी फक्त 26 पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर आरोप केले. पण त्यांनी त्याबाबतचे पुरावे दिले नाहीत. त्यामुळे आता त्यांना बीड पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
Police issues notice to Trupti Desai
17 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावलं आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांच्या अडचणीत भर पडली आहे, असे बोलले जात आहे. जर त्यांनी पोलीस चौकशीला जाताना पुरावे नेले नाही तर त्यांच्या अडचणीत आणखी भर पडू शकते. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या :