Share

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली झाडं जळाली; सयाजी शिंदे संतापले, आता थेट अजित पवारांना भेटणार!

Actor Sayaji Shinde to meet Ajit Pawar after his ‘Sahyadri Devrai’ project in Beed was set on fire for the second time, destroying 7-year-old trees.

Published On: 

Actor Sayaji Shinde to meet Ajit Pawar after his 'Sahyadri Devrai' project in Beed was set on fire for the second time, destroying 7-year-old trees.

बीड – एखाद्या बापाने आपल्या लेकराला ७ वर्ष सांभाळावं आणि डोळ्यादेखत कोणीतरी त्याचा घात करावा, तर त्या बापाची अवस्था काय होईल? असाच काहीसा संतापजनक प्रकार बीडमध्ये घडला आहे. सिनेमे आणि नाटकांतून मनोरंजनाचे धडे देणारे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) सध्या निसर्गाचे धडे गिरवत आहेत, पण बीडमधील समाजकंटकांनी त्यांच्या संयमाचा अंत पाहिलाय. सयाजी शिंदेंनी बीडच्या पालवन शिवारात उभारलेल्या ‘सह्याद्री देवराई’ प्रकल्पाला मागील १५ दिवसांत दुसऱ्यांदा आग लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बीडसारख्या दुष्काळी भागात हिरवाई फुलवण्यासाठी सयाजी शिंदे यांनी रक्ताचं पाणी केलं. मात्र, काही समाजकंटकांनी दिवसाढवळ्या सकाळी ११ वाजता तीन ठिकाणी आगी लावून ७ वर्षांपासून वाढवलेली झाडं जाळून खाक केली आहेत. या आगीत अनेक पक्ष्यांचाही होरपळून मृत्यू झाला, ही बाब मनाला चटका लावणारी आहे. सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त करत सांगितलं की, “झाडं जाळणाऱ्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला. हा प्रकार जाणीवपूर्वक केला जातोय.”

Actor Sayaji Shinde to meet Ajit Pawar

पहिल्यांदा आग लागली तेव्हा १००-१५० झाडं जळाली होती. आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी ते आता जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेणार आहेत.

वनविभागाचे अधिकारी आणि शिंदेंच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. Sahyadri Devrai परिसरात आता सीसीटीव्ही (CCTV) बसवण्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. “बीडमध्ये आधीच झाडं कमी आहेत, त्यात असा प्रकार घडणं अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी खंत सयाजी शिंदेंनी व्यक्त केली आहे. निसर्गाच्या या ‘हिरव्या लेकरां’चा बळी घेणाऱ्यांना आता प्रशासन काय धडा शिकवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install