Rohini Khadse । केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या (Raksha Khadse) मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड काढली होती. याप्रकरणी सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून यापैकी तीन जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी फरार आहेत.
याप्रकरणी आज शरद पवार गटाच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मोठी प्रतिक्रिया आहे. “जर एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील सामान्य माताभगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार?,” असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.
“महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार निरुत्साही आहे. राज्य सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा. माझी, तुमची किंवा कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच पाहिजे,” अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली.
“आज या घटनेला १० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी देखील याप्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे. त्यांचा कोण आका आहे? त्यांना कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळत आहे ज्यामुळे ते इतके दिवस फरार राहू शकले”, असा सवाल रोहिणी खडसेंनी केला.
Rohini Khadse criticize Govt
त्यामुळे आता रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. राज्य सरकार रोहिणी खडसे यांची ही मागणी मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :