🕒 1 min read
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे मोठा राजकीय आणि सामाजिक गदारोळ सुरु आहे. हुंड्यासाठी आणि मानसिक त्रासामुळे 23 वर्षांच्या वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींपैकी काही जण अटकेत असून, सासरे राजेंद्र हगवणे फरार आहेत. या प्रकरणाची राजकीय झळ अजित पवार गटालाही पोहोचली आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कठोर टीका केली होती. “आपल्या महिला आयोगाचा कारभार म्हणजे वरातीमागचं घोडं”, अशा शब्दांत खडसेंनी निशाणा साधला होता.
Vaishnavi Hagwane Case: Rupali Chakankar Hits Back at Rohini Khadse’s Remarks
यावर रुपाली चाकणकर यांनी थेट प्रत्युत्तर देत रोहिणी खडसे यांना सुनावले – “काही विरोधक घटना घडल्यावरच जागे होतात. सोशल मीडियावर आम्ही पहिल्या दिवसापासून सक्रिय आहोत. माझं नाव घेतलं म्हणजे तुमची बातमी झाली.”
चाकणकरांनी पुढे स्पष्ट केलं की, “अशा प्रकरणांमध्ये मुलगी हवी नसते, पैसा हवा असतो. महिलांनी अशा हुंडेखोरांविरोधात तक्रार द्यावी, आम्ही कठोर कारवाई करू.” वैष्णवीच्या बाळाला सध्या तिच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आलं असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी गेली; दुसरी सूनही म्हणते – ‘मीसुद्धा संपले असते’
- “माझं घर उध्वस्त केलं तिच्या चार प्रियकरांनी!” – पतीचा भावनिक आक्रोश
- संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती? भाजप आमदाराचा गंभीर आरोप