🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी: वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तिच्या मृत्यूनंतर आता हगवणे कुटुंबातीलच दुसरी सून मयुरी हगवणे (Mayuri Hagavane) पुढे आली असून, तिने देखील आपल्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
लग्नात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिल्यानंतरही वैष्णवीचा छळ थांबला नव्हता. आणि आता मयुरीच्या कुटुंबीयांनी देखील उघडपणे सांगितलंय – “मयुरी आणि तिचा पती वेगळं राहू लागले, म्हणून ती वाचली… नाहीतर तिचंही वैष्णवीसारखं झालं असतं.”
Mayuri Hagavane allegations of torture and harassment
टीव्ही9 मराठीशी बोलताना वैष्णवीचे आई-वडील आणि मयुरीचे आई व भाऊ मेघराज जगताप यांनी सांगितलं की, हगवणे कुटुंबाकडून दोन्ही सुनांवर आर्थिक व मानसिक दबाव आणला जात होता.
“हगवणे कुटुंबाचे सर्व भांडण वैष्णवीशीच होते. आम्हालाही हुंड्याची मागणी केली होती. पण मयुरी आणि तिचा नवरा वेगळे राहत असल्याने तिला वाचवता आलं. एकत्र राहत असते तर तिचंही वैष्णवीसारखं झालं असतं.” 2022 मध्ये सुशील हगवणे यांच्याशी विवाह झाल्यानंतर, मयुरीवर तिच्या सासू, दीर आणि नणंदेकडून सतत छळ केला जात होता, असा आरोप तिने केला आहे. माझ्या नवऱ्यालाही मारहाण केली, कारण तो कायम मला पाठिंबा देत होता. आम्ही दीड वर्षांपासून वेगळं राहत होतो,” असा खुलासा मयुरीने केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “माझं घर उध्वस्त केलं तिच्या चार प्रियकरांनी!” – पतीचा भावनिक आक्रोश
- संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती? भाजप आमदाराचा गंभीर आरोप
- हगवणे कुटुंबातील थोरल्या सुनेचा महिला आयोगावर गंभीर सवाल; राजकीय दबावाचा आरोप