🕒 1 min read
मुंबई | प्रतिनिधी: राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारण महायुतीच्याच घटक पक्षातील भाजपा आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील मृद व जलसंधारण विभागात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची बेकायदा नियुक्ती करण्यात आली, असा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संदीप जोशी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र लिहून संपूर्ण माहिती सादर केली आहे. या पत्रात त्यांनी विभागात झालेल्या अवैध नेमणुकीचा आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा मुद्दा उचलून धरला आहे.
Sanjay Rathod Bribery Allegations by BJP MLA
भाजप आमदार संदीप जोशी यांनी बोलताना सांगितले की, “अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी 100% पैशांचा व्यवहार झाला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शासकीय निर्णय स्पष्ट असतानाही काही अधिकाऱ्यांनी मार्ग काढत स्वतःच्या बदल्या करून घेतल्या आहेत.”
संदीप जोशी यांच्या म्हणण्यानुसार, एकूण आठ अधिकाऱ्यांची बेकायदा नियुक्ती करण्यात आली असून या नेमणुकांमुळे 375 उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे खात्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होतो, असेही ते म्हणाले. संदीप जोशी यांनी या प्रकारावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हगवणे कुटुंबातील थोरल्या सुनेचा महिला आयोगावर गंभीर सवाल; राजकीय दबावाचा आरोप
- उदय सामंतांचा टोला : “ठाकरे बंधू एकत्र येणार? हे तर शाळकरी अटींसारखं वाटतं!”
- पोस्टमॉर्टम रिपोर्ट! वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागे अमानुष छळाची धक्कादायक माहिती












