🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी – राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणे कुटुंबातील सुन वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर प्रकरणात नवे वळण आले आहे. पोस्टमॉर्टम अहवालात मानेवर दाबाचे आणि शरीरावर बोथट वस्तूंच्या जखमा आढळल्याचे स्पष्ट झालं आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट अजित पवारांना प्रश्न विचारला आहे – “हुंडाबळीला वाचवणार की न्याय देणार?”
पोस्टमॉर्टम अहवालाबरोबरच वैष्णवीचा तिच्या मैत्रिणीला केलेला फोन कॉलही समोर आला आहे. या कॉलमध्ये तिने सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाची हृदयद्रावक माहिती दिली आहे. “सगळ्यांचा विरोध पत्करून लग्न केलं, पण नवऱ्यानेही साथ दिली नाही,” असा तीव्र सूर तिने व्यक्त केला.
Vaishnavi Hagawane Postmortem Reveals Shocking Injuries
पोलिस तपासातही जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीसाठी छळ, मारहाण, याचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला आहे. सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक, सासू, नणंद आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून काहीजणांना अटक झाली आहे, तर मुख्य आरोपी फरार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- वैष्णवी आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा! “माझ्यासोबतही झाला छळ,” – मयुरी हगवणेचा थरारक आरोप
- मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी संघात – टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज!
- “सासऱ्याला जेरबंद करा, सहा पथकं लावा!” – वैष्णवी प्रकरणावर अजित पवारांची तीव्र प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now