मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी संघात – टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज!

Ayush Mhatre to lead India’s Under-19 team for the upcoming England tour. Vaibhav Suryawanshi also included in the squad. The series includes 5 ODIs and 2 Tests starting from June 24.

Published On: 

Ayush Mhatre to lead India's Under-19 team for the upcoming England tour. Vaibhav Suryawanshi also included in the squad. The series includes 5 ODIs and 2 Tests starting from June 24.

प्रतिनिधी – आयपीएल 2025 नंतर भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असतानाच, अंडर-19 क्रिकेट संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने अधिकृत पत्रकाद्वारे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघ जाहीर केला असून, या संघात महाराष्ट्रातील दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

आयुष म्हात्रेला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीलाही संधी मिळाली आहे. इंग्लंड विरुद्ध 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

Ayush Mhatre Named U19 India Captain for England Tour, Vaibhav Suryawanshi in Squad

या दौऱ्याची सुरुवात 24 जूनपासून प्रॅक्टिस मॅचने होईल. त्यानंतर 27 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल आणि 7 जुलैला अखेरचा सामना होईल. त्यानंतर 12 जुलैपासून कसोटी मालिकेला प्रारंभ होईल.

अंडर-19 टीम इंडिया (इंग्लंड दौरा):

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार/विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर एस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, युद्धजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.

India U-19 Tour of England 2025 – Full Time Table

🏏 एकदिवसीय (ODI) मालिका – ५ सामने

दिनांक वार सामना
२४ जून २०२५ मंगळवार ५० षटकांचा सराव सामना
२७ जून २०२५ शुक्रवार पहिला एकदिवसीय सामना
३० जून २०२५ सोमवार दुसरा एकदिवसीय सामना
२ जुलै २०२५ बुधवार तिसरा एकदिवसीय सामना
५ जुलै २०२५ शनिवार चौथा एकदिवसीय सामना
७ जुलै २०२५ सोमवार पाचवा एकदिवसीय सामना

🏏 कसोटी मालिका – २ सामने (४ दिवसांचे)

दिनांक वार सामना
१२ – १५ जुलै २०२५ शनिवार – मंगळवार पहिली कसोटी
२० – २३ जुलै २०२५ रविवार – बुधवार दुसरी कसोटी

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही