🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असतानाच आता हगवणे कुटुंबातील थोरली सून मयूरी हिने गंभीर आरोप केले आहेत. मयूरीने सांगितले की, तिच्या पतीच्या अनुपस्थितीत कुटुंबातील सदस्य तिला मारहाण करायचे आणि घरात कोंडून ठेवायचे.
तिने म्हटले, “लग्नाच्या दोन दिवस आधी माझा अपघात झाला होता. वॉकरच्या सहाय्याने चालत होते. तरीही सासरी राहिले. पण नंतर त्रास सुरू झाला. पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी मला समजूत घालण्याचा प्रयत्न केला. चेहऱ्यावर रक्तस्त्राव असतानाही केवळ एनसी घेतली.”
Mayuri Hagwane’s Shocking Allegations
मयूरीने पुढे सांगितले की, “माझ्या आई-वडिलांविरोधात उलटी क्रॉस कंप्लेंट केली. नंतर पैसे देऊन प्रकरण मिटवले गेले. कुटुंबीय मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा धाक दाखवायचे.” हे आरोप वैष्णवी प्रकरणात आणखी गंभीर वळण देणारे ठरू शकतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- लग्नाला गेलो ही माझी चूक असेल तर फासावर लटकवा! – अजित पवारांचा संताप
- छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी; मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या आग्रहामुळे झाली शपथ
- IPL 2025: GT vs LSG Dream11 टीम तयार करताना ‘या’ खेळाडूंवर ठेवा विश्वास!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












