Share

लग्नाला गेलो ही माझी चूक असेल तर फासावर लटकवा! – अजित पवारांचा संताप

Ajit Pawar expressed anger over being blamed in Vaishnavi hagavane suicide case. “If attending a wedding is my crime, hang me!” he said. He clarified he had no link with the incident.

Published On: 

Ajit Pawar, Baramati, Plane Crash, NCP, Maharashtra Politics, Breaking News

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली बाजू मांडताना संताप व्यक्त केला आहे. “कोणाच्या लग्नाला गेलो म्हणून जर माझी चूक असेल, तर मला फासावर लटकवा,” असं थेट वक्तव्य त्यांनी केलं आहे.

वैष्णवी ही अजित पवारांच्या गटाच्या एका नेत्याची सून होती. लग्नावेळी अजित पवारही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आरोप होत असतानाच त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. “मी लग्नाला गेलो म्हणून मला दोष देताय? माझं काय घेणं-देणं आहे त्यांचं घरात काय चाललंय याचं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar on Vaishnavi Suicide Case

“सासू, नणंद आणि नवरा हे तुरुंगात आहेत. सासरा फरार आहे, पण लवकरच सापडेल. मी पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत – जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा,” असं अजित पवार म्हणाले.

“माझी चूक नसेल तर उगाच नाव घ्या नका. मी कोणालाही सुनेशी वाईट वागा, त्रास द्या असं सांगत नाही. उलट मी लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणं सुरू केलं – अशी योजना आम्ही सुरू केली आहे,” असं सांगून त्यांनी प्रसारमाध्यमांवरही नाराजी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!