🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून टाकले असताना, आता तिच्या जावेने – मयुरी हगवणेने धक्कादायक खुलासे केले आहेत. मयुरी हगवणेने म्हटलं आहे की, “वैष्णवीवर जो अन्याय झाला, तोच माझ्यावरही झाला आहे. लग्नाच्या सहा महिन्यांतच माझ्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला होता.”
सासऱ्याचं वागणं इतकं घृणास्पद होतं की ते बोलूनही दाखवता येणार नाही. अपमानास्पद वागणूक, मारहाण हे तिच्या वैवाहिक जीवनाचा भाग बनलं होतं. शेवटी ती नवऱ्यापासून वेगळी झाली आणि पोलिसांत तक्रार दिली. मयुरीने असंही सांगितलं की तिची नणंद पिंकी हिचं घरात पूर्ण वर्चस्व आहे. सून काहीही म्हणाली तरी ऐकून घेतलं जात नाही. “सुनांपेक्षा लेकीला घरात जास्त महत्त्व दिलं जातं,” असा आरोपही तिने केला.
Vaishnavi Hagwane Suicide: Mayuri Alleges Same Harassment
मेघराज जगताप ( मयुरीचा भाऊ ) म्हणाला की, “५ नोव्हेंबर २०२४ रोजी आम्ही पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी टाळाटाळ केली. शेवटी पहाटे तक्रार लिहून घेतली. पण कोणतीही कारवाई केली नाही.”
हुंड्याच्या मुद्यावरही मयुरीने सांगितले की, “फॉर्च्युनर गाडी असावी अशी सासूची इच्छा होती. फोनवर बोलताना तिने सांगितलेलं मी ऐकलं होतं. मी वेगळी राहत असल्यामुळे किती हुंडा दिला हे माहिती नाही, पण टोमणे नक्की मिळाले.”
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी संघात – टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज!
- “सासऱ्याला जेरबंद करा, सहा पथकं लावा!” – वैष्णवी प्रकरणावर अजित पवारांची तीव्र प्रतिक्रिया
- “माझे पती नसताना हे लोक घरात घुसून…”; हगवणे कुटुंबीयांविरोधात थोरल्या सुनेचा धक्कादायक आरोप