🕒 1 min read
प्रतिनिधी – राज्याच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरे यांनी अलीकडेच म्हटले की “महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे मतभेद नगण्य आहेत.” या विधानावर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर, ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा जवळीक होणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंसमोर काही अटी मांडण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत यांनी उपरोधिकपणे टीका केली आहे.
Uddhav and Raj Thackeray Reuniting? Uday Samant Calls It Childish Drama
“राज ठाकरे यांच्या समोर घातलेल्या अटी या शाळेतल्या मुलांप्रमाणे आहेत. राज ठाकरेंचं नेतृत्व एवढं लहान नाही की ते अशा अटींवर झुकतील. उद्या जर त्यांनी अट घातली की राहुल गांधी यांना भेटू नका, असं म्हटलं तर उद्धव ठाकरे काय करतील? बघू या, पुढे कोण कोणाकडे टाळी मागतंय,” असं सामंत म्हणाले.
या दरम्यान पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरही उदय सामंत यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. “ही अमानुष घटना आहे. नीच पातळीचा प्रकार आहे. तीन आरोपींना अटक झाली आहे, उरलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. काही तासांत अटक होईल. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारची गंभीर भूमिका असेल.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- पोस्टमॉर्टम रिपोर्ट! वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागे अमानुष छळाची धक्कादायक माहिती
- वैष्णवी आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा! “माझ्यासोबतही झाला छळ,” – मयुरी हगवणेचा थरारक आरोप
- मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे कर्णधारपद, वैभव सूर्यवंशी संघात – टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज!