🕒 1 min read
प्रतिनिधी – पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आता हगवणे कुटुंबातील थोरली सून मयूरी जगताप हिने महिला आयोगावर थेट बोट ठेवत गंभीर आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या प्रकरणात आयोगाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही आणि पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची शक्यता तिने व्यक्त केली आहे.
मयूरी जगताप हिने सांगितले की, “महिला आयोगाने माझ्या प्रकरणात काही पावलं उचलली नाहीत, त्यामागे राजकीय हस्तक्षेप असू शकतो. एफआयआर करताना पोलिसांचा सुर अचानक बदलला, पहिल्या दिवशी सौम्य असलेली भाषा दुसऱ्या दिवशी अरेरावी झाली.”
Mayuri Jagtap Blames Women Commission in Vaishnavi Hagawane Case
तिने वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या चौघांना जन्मठेप देण्यात यावी, अशी मागणी केली. “तिचा नवरा आणि सासरचे लोक यांच्यामुळे ती सैरभैर झाली. माझ्या वाट्याला आलेला त्रास तिलाही सहन करावा लागला, पण ती सुटू शकली नाही,” असे मयूरी म्हणाली.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिनांक १९ मे २०२५ रोजी या प्रकरणाची दखल घेतली असून, पुणे पोलिसांना चौकशी आणि कारवाईचे निर्देश दिल्याचे सांगितले. मात्र, मयूरीच्या मते, ही भूमिका आधीच घेतली असती तर वैष्णवी वाचली असती.
📌 महत्वाच्या बातम्या
- उदय सामंतांचा टोला : “ठाकरे बंधू एकत्र येणार? हे तर शाळकरी अटींसारखं वाटतं!”
- पोस्टमॉर्टम रिपोर्ट! वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागे अमानुष छळाची धक्कादायक माहिती
- वैष्णवी आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा! “माझ्यासोबतही झाला छळ,” – मयुरी हगवणेचा थरारक आरोप