🕒 1 min read
ग्वालियर | प्रतिनिधी: “ती माझी पत्नी होती… पण आज ती परकी झाली आहे… चार प्रियकर, मुलाचं संशयास्पद निधन आणि आता माझ्या जीवाची भीती!” अशा शब्दांत अमित सेन नावाच्या एका त्रस्त पतीने ग्वालियर जिल्हाधिकारी कार्यालयात ( Gwalior collector) आपल्या आयुष्यातील वेदना मांडल्या. एक पोस्टर, काही छायाचित्रं, आणि भर चौकात फुटलेलं रडणं — ही कहाणी कुठल्याही सिनेमाहून कमी नाही.
अमित सेन यांनी हातात घेतलेलं पोस्टर पाहून कलेक्टर रुचिका चौहान यांनाही क्षणभर धक्का बसला. त्यात लिहिलं होतं, “माझ्या पत्नीचे चार बॉयफ्रेंड आहेत, सध्या ती एका प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये आहे. माझ्या मोठ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू तिच्यामुळे झाला, आणि आता माझाही जीव धोक्यात आहे.”
Gwalior Man Accuses Wife of 4 Affairs
अमितचा आरोप आहे की, पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून मोठ्या मुलगा हर्षचा खून केला, आणि आता ती लहान मुलाला घेऊन राहुल बाथम नावाच्या व्यक्तीसोबत राहत आहे. या विरोधात आवाज उठवताच प्रियकराने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. “ती माझ्याकडून दरमहा पैसे घेत असे, आणि ते दारू-सिगारेटवर खर्च करत होती. माझ्याकडे याचे व्हिडिओ पुरावेही आहेत!” असं अमितने म्हटलं.
अमितने अनेक वेळा पोलिस स्टेशन व एसपी कार्यालयात तक्रार केली. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. आता तो म्हणतो की, “जर मला न्याय मिळाला नाही, तर मी आत्महत्या करेन…” ग्वालियरच्या कलेक्टर रुचिका चौहान यांनी या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिलं असून, दोघांचं कौटुंबिक समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. “ही वैयक्तिक बाब असली, तरी जी काही भीती आणि त्रास आहे, त्यावर उपाय केला जाईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती? भाजप आमदाराचा गंभीर आरोप
- हगवणे कुटुंबातील थोरल्या सुनेचा महिला आयोगावर गंभीर सवाल; राजकीय दबावाचा आरोप
- उदय सामंतांचा टोला : “ठाकरे बंधू एकत्र येणार? हे तर शाळकरी अटींसारखं वाटतं!”