Share

संकेत चोंधेच्या भावजईचे गंभीर आरोप; वैष्णवी प्रकरणाशी धक्कादायक संबंध उघड

Vaishnavi Hagwane case link grows. Dhanashri Chondhe, wife of Suyash Chondhe, accuses her in-laws of torture. Police case filed in Pune.

Published On: 

Dhanashri Chondhe Files Case Against In-Laws, Suyash Chondhe; Linked to Vaishnavi Hagwane Suicide Case

🕒 1 min read

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात उकल होत असताना आता संकेत चोंधे या व्यक्तीच्या कुटुंबावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हाच संकेत चोंधे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या फरार आरोपींना थार गाडी देऊन मदत करत होता. चोंधेच्या कुटुंबातीलच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

संकेत चोंधेचा भाऊ सुयश चोंधे याच्याविरोधात त्याच्या पत्नीने थेट खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. छळ, मारहाण, हुंड्यासाठी मानसिक त्रास अशा गंभीर आरोप सुयशच्या पत्नीने केले आहे. तक्रारीनुसार, सुयश, त्याची सासू वैशाली चोंधे, सासरा नरेश चोंधे आणि दीर संकेत चोंधे यांनी एकत्रितपणे पीडितेवर मानसिक व शारीरिक छळ केला.

Dhanashri Chondhe Files Case Against In-Laws

पीडित महिलेने यापूर्वी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर तिने ७ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा आता बावधन पोलीस ठाण्यातूनही तपास सुरू करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संकेत चोंधे वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी असलेल्या हगवणे पितापुत्रांना मदत करत होता.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही