Share

“सासू करते काळी जादू!” – विवाहितेचा धक्कादायक आरोप, आत्महत्येचा प्रयत्न, हगवणे कनेक्शन पुन्हा चर्चेत

Wife attempts suicide in Pune after harassment. Claims her mother-in-law was doing black magic. Police find link to Haghawane case.

Published On: 

Wife attempts suicide in Pune after harassment. Claims her mother-in-law was doing black magic. Police find link to Haghawane case.

🕒 1 min read

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करत सासरच्या छळाचा आरोप करतानाच, आपल्या सासूने ‘काळी जादू’ ( Black Magic ) करत असल्याचा गंभीर दावा केला आहे.

ही महिला सुयश चौंधे यांची पत्नी असून तिने खडक पोलिस स्टेशनमध्ये आणि महिला आयोगात पाच महिने आधी तक्रार दाखल केली होती. मात्र, कारवाई शून्यच राहिल्याचा आरोप पीडितेने केला.

Pune woman alleges Black magic by mother-in-law

तिच्या म्हणण्यानुसार, “लग्नात दोन लाख रुपये व दोन तोळे सोनं दिलं, पण तरीही सासरच्या मंडळींची पैशांसाठी छळवणूक सुरूच होती. २० लाखांचा हुंडा मागण्यात आला. मारहाण झाली. आणि माझी सासू काळी जादू करते.” – असा थरकाप उडवणारा आरोप पीडितेने केला आहे.

💣 थार गाडी कनेक्शन – ‘हगवणे’ पुन्हा चर्चेत

या प्रकरणात राजेंद्र हगवणे, वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी याचं नावही पुन्हा चर्चेत आलं आहे. तो आणि त्याचा मुलगा जी ‘थार’ गाडी वापरत होते, ती गाडी या प्रकरणातील पीडितेचा दीर संकेत चौंधे याची होती. पोलीस तपासात हे उघड झाल्यानंतर चौकशीसाठी संकेतला बावधन पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं.

🚨 गंभीर स्वरूपाची चौकशी अपेक्षित

दरम्यान, पोलीस स्टेशनबाहेर मोठा जमाव जमल्याची माहिती आहे. पीडिता स्वतःही या वेळी उपस्थित होती. हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचं बनत आहे. सासरकडून केवळ हुंडा नव्हे तर ‘काळी जादू’ करून मानसिक छळ केला जात होता, पोलिसांनी तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या