Share

WhatsApp वर शानदार फीचरची एंट्री, वापरकर्त्यांना मिळणार इंस्टाग्रामसारखं टूल

by MHD
WhatsApp New Feature for status updates

WhatsApp । व्हॉट्सॲप हे एक सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲपचे फक्त भारतातच नाही तर जगभरात देखील लाखो युजर्स आहेत. कंपनी आपल्या अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर (WhatsApp Feature) घेऊन येत असते. ज्याचा त्यांना फायदा होतो.

जर तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी इंस्टाग्राम (Instagram) सारखं एक भन्नाट फिचर (Feature for WhatsApp Users) घेऊन येत आहे. सध्या या फीचरवर कंपनी काम करत आहे, ज्याचा वापरकर्त्यांना खूप फायदा होईल.

वापरकर्त्यांना आता आपल्या स्टेटससाठी गॅलरी सेक्शनमध्ये दोन नवीन शॉर्टकट्स पाहायला मिळणार आहेत. हे शॉर्टकट्स खास करून टेक्स्ट स्टेटस आणि व्हॉइस मेसेज स्टेटससाठी असणार आहेत. ज्याचा वापर करून वापरकर्त्यांना त्यांच्या अपडेट्स सहज शेअर करता येईल.

व्हॉट्सॲप युजर्सना त्यांच्या स्टेटसवर व्हॉइस नोट्स (WhatsApp Voice notes on status) जोडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पण त्यासाठी कोणताही खास शॉर्टकट उपलब्ध करून दिला नाही. नवीन अपडेटमध्ये स्टेटस सेक्शनमध्ये वेगळ्या व्हॉइस मेसेजचा पर्याय मिळणार आहे.

WhatsApp New Feature

जो फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्ट स्टेटसच्या सोबत असणार आहे. हे लक्षात घ्या की सध्या ही सुविधा बीटा चाचणी टप्प्यात आहे. लवकरच अपडेटच्या स्वरूपात रोलआउट केले जाऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या स्टेटस फिचर्समध्ये सतत सुधारणा करत असते.

महत्त्वाच्या बातम्या :

If you are also using WhatsApp, there is a good news for you. The company is soon bringing an amazing feature similar to Instagram for its users.

Marathi News Mobile Technology

Leave a Comment