RCB । येत्या २१ मार्चपासून आयपीएलची (IPL 2025) सुरुवात होणार आहे. परंतु अजूनही आरसीबीने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली नाही. त्यामुळे चाहत्यांना आरसीबीचा नवीन कर्णधार कोण होणार? असा सवाल पडत आहे. अशातच आता आरसीबीच्या कर्णधारपदाबाबत (RCB new captain) मोठी अपडेट समोर आली आहे.
आज आरसीबीने नवीन कर्णधार घोषित केला आहे. जरी मागील काही हंगामात आरसीबीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम शानदार असला तरी तो या संघाला चॅम्पियन बनवू शकला नाही. कारण कोहलीच्या नेतृत्वाखाली या संघाने 70 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.
Rajat Patidar appointed new RCB captain for IPL 2025
संघाने फाफ डु प्लेसिसला कायम न ठेवल्यानंतर आता संघाला नवीन कर्णधाराची गरज भासत होती. संघाने आता रजत पाटीदारला (Rajat Patidar) कर्णधारपद दिले आहे. रजत पाटीदारबाबत सांगायचे झाले तर तो २०२१ पासून संघासोबत आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी संघाने राखून ठेवलेल्या तीन खेळाडूंपैकी तो एक होता.
रजत पाटीदार २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामात मध्य प्रदेश राज्य संघाचे नेतृत्व करत होता. आज अखेर आरसीबीने त्याच्या नावावर कर्णधारपदाचा शिक्कामोर्तब केला आहे.
Captain of RCB IPL 2025
विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत विराट कोहलीचे नाव नव्हते. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. आज आरसीबीने विराट कोहली याच्याऐवजी रजत पाटीदारला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :