Sanju Samson । टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसनला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर संजू सॅमसन आता २१ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2025) खेळणार की नाही? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.
आयपीएलमध्ये संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार आहे. परंतु, आयपीएल (IPL) सुरु होण्यापूर्वी त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. या दुखापतीपासून पूर्णपणे सावरण्यासाठी सॅमसनला कमीत कमी एक महिन्याचा वेळ लागेल.
संजू सॅमसनच्या बोटावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर, डॉक्टरांच्या संपूर्ण टीमसह हॉस्पिटलमधून त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचा हा फोटो पाहून त्याचे चाहतेदेखील चिंतेत पडले आहेत.
दरम्यान, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची टीम बर्यापैकी बदलली असल्याचे दिसून येणार आहे. संजू सॅमसनच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या एकूण १६८ सामन्यांमध्ये ४४१९ धावा केल्या आहेत.
Sanju Samson in IPL 2025
तसेच मागील वर्षी म्हणजे आयपीएल २०२४ मध्ये, त्याने राजस्थान रॉयल्ससाठी १५ डावात एकूण ५३१ धावा केल्या होत्या. तर संजू सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी एकूण ५८ सामने खेळले असून ज्यात त्याने एकूण १४७१ धावा केलेल्या आहेत. भारतासाठी संजू सॅमसनने १६ एकदिवसीय आणि ४२ टी-२० सामने खेळले असून यात ३ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या :