Share

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी Shubman Gill चा मोठा पराक्रम, शतकी खेळीसह केला अनोखा विक्रम

Shubman Gill completed his century in the third ODI against England ahead of the Champions Trophy. He has also made a unique record. The India vs England 3rd ODI will be held at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.

by MHD

Published On: 

Shubman Gill Century in India vs England 3rd ODI

🕒 1 min read

Shubman Gill । भारताचा स्टार खेळाडू शुभमन गिल नवनवीन विक्रमाला गवसणी घालत असतो. अनेकदा त्याने दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत. यामुळे शुभमन गिल सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. अशातच आता त्याने आणखी विक्रम आपल्या नावावर केला आहे.

शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 95 चेंडूत शतक केले आहे. या कामगिरीमुळे शुभमन गिल हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान सात शतके करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. (India vs England 3rd ODI)

शुभमन गिलने सर्वात जलद गतीने 2500 एकदिवसीय धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे शुभमन गिलने केवळ 50 डावांमध्ये हा विक्रम केला आहे. यापूर्वी हाशिम अमलाने 2500 धावा करण्यासाठी 51 डाव ​​घेतले घेतले होते.

या कामगिरीमुळे शुभमन गिल सर्वाधिक धावा (5287) करणारा खेळाडू बनला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गिलने अशी कामगिरी केली आहे, त्यामुळे गिलचा हाच फॉर्म चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असाच राहतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shubman Gill 7th ODI century in IND vs ENG

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) बाद झाल्यानंतर गिलने संयमाने फलंदाजी केली आहे. यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडचा सुफडा साफ करण्याचा प्रयत्न करता येईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Where will India vs England 3rd ODI match be held?

IND vs ENG तिसऱ्या एकदिवसीय सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होत आहे.

IND VS ENG 3rd ODI Match Where To Watch On TV?

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण होत आहे.

India vs England 3rd ODI Match Live Streaming Details

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम होत आहे.

Team India squad for 3rd ODI

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (विकेटकिपर), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्षदिप सिंग

Team England squad for 3rd ODI

जोस बटलर (कर्णधार), फिल्ल सॉल्ट (विकेटकिपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

Leave a Comment

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही