Prakash Ambedkar । भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) आणि संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना पोलिसांना माफ करा, अशी मागणी केली होती.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हाच मुद्दा उचलून धरत विरोधकांनी त्यांच्या टीका करत त्यांच्यावर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Prakash Ambedkar on Suresh Dhas
“सुरेश धस यांची डुप्लिकेट भूमिका बाहेर आली आहे. जर नॉन मराठ्यावर अन्याय झाला तर सोडून द्या आणि संतोष देशमुख यांना न्याय द्या. ही जी धसची भूमिका आहे, ती पूर्णपणे चुकीची भूमिका आहे. त्यांची भूमिका समाजामध्ये द्वेष पसरवणारीआहे,” असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
पुढे प्रकाश आंबडेकर म्हणाले की, “मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वेळ मागितली आहे. कायदेशीर प्रक्रिया असल्याने परभणीच्या घटनेमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. पण लातूरमधील ऑनर किलिंगची घटना आहे. त्यासाठी मी फडणवीस यांची वेळ मागितली आहे. तिथे असणाऱ्या राजकारण्यांनी द्वेष पसरवण्याचे काम थांबवा,” असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
Prakash Ambedkar and Amol Mitkari meet
“अमोल मिटकरी अकोला जिल्ह्याचे असल्याने ते नेहमीच भेटत असतात. जर अकोला जिल्ह्याचे काही प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांच्या मार्फत भेटतो,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबडेकर यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या भेटीवर दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :