Share

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या Suresh Dhas यांची नाकारली अजित पवारांनी भेट, नेमकं कारण काय?

by MHD
Ajit Pawar avoid meeting with Suresh Dhas

Suresh Dhas । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर ते सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा मागत आहेत.

यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देखील धस यांनी मुंडेंविरोधात पुरावे दिले आहेत. अशातच आज सुरेश धस हे पुन्हा एकदा अजित पवार यांची भेट घेणार होते.

परंतु, अजित पवारांनी त्यांची भेट नाकारल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीदरम्यान सुरेश धस हे अजित पवारांकडे 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते. त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नसल्याने ते बीडला निघून गेले आहेत.

अजित पवार यांनी सध्या चौकशी समितीला फक्त 2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना म्हणजेच 2019 ते 2023 काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याने त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Beed Guardian Minister Ajit Pawar avoid meeting with Suresh Dhas

म्हणून ते अजित पवार यांची भेट घेणार होते. दरम्यान, अजित पवार हे 2019 ते 2023 या काळातील चौकशीसाठी परवानगी देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. यावर सुरेश धस काय भूमिका घेतात? हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या :

Suresh Dhas has given evidence against Munde to Ajit Pawar. Today, Suresh Dhas was going to meet Ajit Pawar once again.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment