बारामती, 7 ऑक्टोबर: बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंड पुकारले असून, हे बंड सुनेत्रा पवार यांच्या जिव्हारी लागले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कारखान्याचे कार्यक्षेत्र प्रचारासाठी पिंजून काढले असून चोपडज गावात शेतकरी सभासद आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
ग्रामस्थांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कार्याचा आणि बारामतीच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. अजित पवार यांनी स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करून लोकांच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून दिले, तरीही लोक ‘दादांनी काही केले नाही’ असे म्हणतात याचे दुःख वाटते, असे सांगताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या. रानात घरे बांधून तिथे वीज आली नाही म्हणून दादांच्या नावाने बोंब मारणे योग्य नाही, बारामतीत पाणी कोणी आणले याचाही विचार झाला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
प्रत्यक्ष राजकारणाशी आपला संबंध नव्हता, मात्र दादांनंतर लोक पोरके होऊ नयेत यासाठी आपण ही जबाबदारी स्वीकारली, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. शेतकरी आणि ग्रामस्थांनी स्थानिक प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी माहिती घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. इथून पुढे जे काही लागेल त्यासाठी दादांसारखीच मी तुमच्यामागे खंबीरपणे उभी राहीन, असा विश्वासही त्यांनी ग्रामस्थांना दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- EVM ला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा आसाममध्ये बॅलेट पेपरवरही पराभव; ४२ पैकी केवळ २ जागांवर विजय
- शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: ‘अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचाच’, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद
- भाजप नेत्याच्या नातवाकडून मुलीला मारहाण? नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरेंचा पलटवार
Quick Answers
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंड पुकारले आहे.
अजित पवार यांनी स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करून लोकांच्या प्रश्नांसाठी स्वतःला झोकून दिले, तरीही लोक ‘दादांनी काही केले नाही’ असे म्हणतात, याचे दुःख वाटते असे सांगताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या.
प्रत्यक्ष राजकारणाशी आपला संबंध नव्हता, मात्र दादांनंतर लोक पोरके होऊ नयेत यासाठी आपण ही जबाबदारी स्वीकारल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









