Instagram । अलीकडच्या काळात Instagram आणि YouTube चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तरुणाई या दोन सोशल मीडियावर (Social media) दंग झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेकजण या माध्यमांचा वापर करून लाखो रुपयांच्या घरात कमाई करत आहे.
पण अनेकदा अनेकांना असा प्रश्न पडतो की Instagram की YouTube च्या माध्यमातून जास्त कमाई करता येईल. यासाठी काही निकष लागू केले आहेत. तुम्हाला इन्स्टाग्रामवर ब्रँड स्पॉन्सरशिप हे कमाईचं मुख्य माध्यम आहे. जर फॉलोअर्सची संख्या जास्त असेल तर कंपन्या त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी पहिले प्राधान्य देतात. याच्या शॉपिंग फिचरवर युजर्सना त्यांची उत्पादने विक्री करता येतात.
तसेच युट्यूबवर (YouTube) तुम्हाला व्हिडीओवर (YouTube Videos) येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवता येतात. चॅनल सब्र्सक्राईब करणाऱ्यांना चॅनलकडून विशेष सेवा देण्यात येते. जिथं त्यांना एक्सक्लुझिव्ह कंटेंट पाहता येतो. तसेच असे अनेक ब्रँड इन्स्टाग्रामप्रमाणे त्यांचे प्रोडक्ट प्रसिद्ध करण्यासाठी युट्यूबर्सशी करार करतात आणि त्याच्या माध्यमातून युजर्सना पैसे कमावता येतात.
Earning from Social media
हे लक्षात घ्या की माध्यम युट्यूब असो किंवा इन्स्टाग्राम. तुम्हाला दोन्हींपैकी कोणत्याही माध्यमातून आपला कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला चांगली कमाई करता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :