Share

बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, “मास्टरमाईंडला…”

बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, "मास्टरमाईंडला..."

Bajarang Sonawane । बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यभरातून अनेक मागण्या केल्या जात आहेत, अनेक आंदोलने होत आहेत. दिवसेंदिवस हे प्रकरण (Santosh Deshmukh murder case) चिघळत चालले आहे. अशातच आज संतोष देशमुख यांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेणार आहेत. दरम्यान खासदार बजरंग सोनावणे ( Bajarang Sonawane ) यांनी या प्रकरणातल्या आरोपींबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

“९ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. एसआयटी नेमली, सीआयडीचा तपास सुरु आहे. कुठल्या तपासासाठी पोलीस कोठडी घेतली जाते आहे? मोबाइल कुठे ते कसं समजत नाही? जर आरोपी पोलिसांना माहिती देत नसतील तर त्यांना जनतेच्या स्वाधीन करा, जनता काय करायचं ते पाहून घेईल”, असं बजरंग सोनावणे म्हणाले.

“मास्टरमाईंडलाही शिक्षा झाली पाहिजे”

काल अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या कालपासून ऐकायला मिळत आहेत. यावर सोनावणे म्हणाले, “धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या बैठकीत काय ठरलं त्याचे तपशील माझ्याकडे नाहीत. ते मला जर या दोघांपैकी कुणी सांगितले तर मी त्यावर बोलू शकतो. आत्ता आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि जो मास्टरमाईंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या :

“आत्ता आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि जो मास्टरमाईंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे”, असं बजरंग सोनावणे ( Bajarang Sonawane )म्हणालेत.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now