Share

सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वीच Santosh Deshmukh यांच्या भावाने घेतली ‘ती’ याचिका मागे

Today Santosh Deshmukh’s family will meet Chief Minister Devendra Fadnavis in the evening. But earlier Sarpanch Santosh Deshmukh’s brother Dhananjay Deshmukh has taken a big decision.

by MHD

Published On: 

सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वीच Santosh Deshmukh यांच्या भावाने घेतली 'ती' याचिका मागे

🕒 1 min read

Santosh Deshmukh । आज संतोष देशमुख यांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची संध्याकाळी भेट घेणार आहेत. पण यापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Santosh Deshmukh murder)

धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावत वकील शोमित साळुंखे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती. वाल्मिक कराडवर (Walmik Karad) हत्येचा गुन्हा दाखल करून मोक्का लावावा आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Dhananjay Deshmukh withdraws petition

“सध्या सुरू असलेल्या तपासावर आपण बऱ्यापैकी समाधानी आहोत, त्यामुळे आपण ही याचिका मागे घेत आहे,” अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, देशमुख कुटुंब अहिल्यानगरहुन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत देशमुख कुटुंबीय काय चर्चा करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)