Santosh Deshmukh । बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणावरून राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. याच मुद्द्याला उचलून धरत सत्ताधारी खेळखंडोबा करत असल्याचा आरोप केला आहे.
“चीत भी मेरा पट भी मेरा अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. अडीच वर्षांपासून एखादा प्रसंग आला की, अर्धे मंत्रिमंडळ एका बाजूला, तर अर्धे दुसऱ्या बाजूला असते. सत्ताधारी खेळखंडोबा करत आहेत,” असा आरोप विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू शकते.
Satej Patil on Santosh Deshmukh case
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत. पण अजित पवार गटाची नेमकी काय भूमिका आहे, हे अजूनही स्पष्ट होत नाही. या प्रकरणातील काही संशयित सापडले, तर काही पसार आहेत हे वास्तव आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या :