Political crisis । मागील काही दिवसांपासून देशासह राज्याचे राजकारण विविध कारणावरून चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. यावरून अनेकदा टोकाचे वाद झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. खासदारांच्या दबावामुळे पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी आपल्या पदाचा आणि लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते 11 वर्षे लिबरल पार्टीचे नेते (Leader of the Liberal Party) आणि नऊ वर्षे कॅनडाचे पंतप्रधान होते. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातील नाराजी वाढत होती. याच कारणास्तव त्यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. (Justin Trudeau resigns)
Justin Trudeau resignation
डिसेंबर 2024 मध्ये कॅनडाचे अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर देखील ट्रुडो यांच्यावर दबाव वाढला होता. ट्रम्प सतत ट्रुडो यांना टार्गेट करत होते. शिवाय मागील काही महिन्यांपासून त्यांच्याच पक्षाचे खासदार ट्रुडो यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत होते. अखेर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :