Suresh Dhas | मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. पण ही भेट नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आहे, असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं. बीड सरपंच हत्या प्रकरणात आपल्याबाबत मीडिया ट्रायल सुरु असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. यावर आता सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
“कोणतं मीडिया ट्रायल? मीडियाला जे दिसतं ते मीडिया मांडतं. मी 15 ते 20 दिवसांपूर्वी मीडियाला माहीतही नसेल मी कोणता गावचा आहे. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही मीडियाला हलक्यात घ्यायला लागलात का? मीडिया ट्रायल वगैरे नाही. हा ओरिजनल ट्रायल आहे. त्यामध्ये आता एक-एक गोष्टी बाहेर येतील”, असा खुलासा सुरेश धस यांनी केला आहे.
“तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? मग ट्रायल होत नाही तोपर्यंत पदावरुन बाजूला जा. पदावर चिटकून कशाला राहता? उपमुख्यमंत्री अजित पवारांना कशाला सांगायची पाळी आणता?”, असे सवाल करत सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. “तुम्ही स्वत:हून राजीनामा द्या. ह्यांचं काही वाटोळं होणार नाही. अजित दादांचं पटांगण होणार आहे. अजित दादांसोबत गेलेले लोकं परत शरद पवारांकडे जातील नाहीतर नवीन पाहतील”, असं सुरेश धस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :