Share

“छगन भुजबळांची ‘ती’ भूमिका मला पटली नाही”; Vijay Wadettiwar स्पष्टच बोलले

"छगन भुजबळांची 'ती' भूमिका मला पटली नाही"; Vijay Wadettiwar स्पष्टच बोलले

Vijay Wadettiwar । मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचे नाव वारंवार समोर येत असून ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला सहमत नसल्याचं म्हंटल आहे.

“हत्येसारख्या गुन्ह्यात आरोप होत असतील तर राजीनामा दिला पाहिजे. कारण या प्रकरणातले पुरावे दाबले जात आहेत, नष्ट केले जात आहेत त्यामुळेच आम्ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत”, असं म्हणत त्यांनी भुजबळांच्या भूमिकेला विरोध केला आहे.

“छगन भुजबळ यांचं म्हणणं कुणालाही पटणारं नाही. आरोपी हा आरोपी असतो त्याला जात-पात, धर्म काहीही नाही. मात्र आत्ता जे काही स्वरुप दिलं जातं आहे ते ओबीसी विरुद्ध मराठा असं दिलं जातं आहे पण त्यात काही तथ्य नाही. अमानुष खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. तसंच चौकशीत जे अडथळे आणत आहेत त्यांना सत्तेतून बाजूला केलं पाहिजे”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हणालेत छगन भुजबळ ?

छगन भुजबळ म्हणाले, “जोपर्यंत नक्की होत नाही, ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची घाई का? त्यांनी राजीनामा का द्यावा आणि कुणी मागावा? साप साप म्हणून भुई थोपटणं योग्य नाही. कारण नसताना, काहीही सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं मी तेलगी प्रकरणात सोसलं आहे.”

महत्वाच्या बातम्या :

ओबीसी नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला सहमत नसल्याचं म्हंटल आहे.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now