आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! Sudarshan Ghule बाबत धक्कादायक माहिती आली समोर

A sensational information is coming out about the accused Sudarshan Ghule. Meanwhile, the accused in this case, Krishna Andhale, is absconding and the search for him is on.

by MHD

Published On: 

आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! Sudarshan Ghule बाबत धक्कादायक माहिती आली समोर

Sudarshan Ghule । मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आता संपूर्ण मोर्चे काढण्यात येत आहेत. अशातच आता आरोपी सुदर्शन घुलेबाबत एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. (Santosh Deshmukh case update)

माहितीप्रमाणे, सुदर्शन घुलेची आधीपासूनच गावात आणि संपूर्ण तालुक्यात दहशत होती. तो 3333 हा नंबर लकी मानत असायचा. इतकेच नाही तर सुधीर सांगळे याच्यासह त्याच्या गँगचं नाव देखील 3333 होते. संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी घुलेने जी कार वापरली होती, त्याच्या त्या गाडीचा नंबर 3333 हाच होता.

दरम्यान, आता 3333 कनेक्शन समोर आल्याने सर्वत्र त्याची चर्चा होऊ लागली आहे. न्यायालयाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार असून त्याचा शोध शुरू आहे.

Sudarshan Ghule 3333 conection

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी काल पुण्यात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबतच सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही