Jitendra Awhad । संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh case) आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद करत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केला आहे.
बोलताना ते म्हणाले की, “याआधी बीडमध्ये झालेल्या सर्व गुन्ह्यांची चौकशी व्हावी. राज्यातले सरकार मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटू शकते.
“मरणारा तर गेला, त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर या राज्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. देशमुख प्रकरणात माणुसकीची हत्या झाली असून त्यांना जाळून मारल आहे. आम्ही संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहे. तसेच 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा, अशी आव्हाड यांनी पुन्हा एकदा मागणी केली.
Jitendra Awhad claim Dhananjay Munde and Walmik Karad
तसेच, गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. त्यांनी सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :