Share

बीड प्रकरणावरून Sharad Pawar यांनी फडणवीसांना पत्राद्वारे केलेल्या मागणीमुळं सर्वांचं वेधलं लक्ष

by MHD
बीड प्रकरणावरून Sharad Pawar यांनी फडणवीसांना पत्राद्वारे केलेल्या मागणीमुळं सर्वांचं वेधलं लक्ष

Sharad Pawar । बीड प्रकरणावरून राज्याचे आणि राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना विरोधी पक्षनेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले आहे. त्यावरून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महिनाभरापूर्वी काही गुंडांकडून सरपंच स्व. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा खून करण्यात आला. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत, अशी जनभावना आहे. याच कारणास्तव या संपूर्ण घटनेला खूप मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असे पाहायला मिळते.

आता याच गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. त्यांनी सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Sharad Pawar wrote letter to CM Devednra Fadanvis

दरम्यान, राज्य सरकारने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना केली आहे. पण आता या SIT मधून तीन अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. एपीआय महेश विघ्ने (Mahesh Vighne), हवलादार मनोज वाघ (Manoj Wagh) आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून काढले आहे. या अधिकाऱ्यांचा वाल्मिक कराड (Walmik Karad) सोबतचा फोटो व्हायरल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या :

Now NCP chief Sharad Pawar has written a letter to Chief Minister Devendra Fadnavis. It has drawn everyone’s attention.

Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now