Santosh Deshmukh । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. पण दिवसेंदिवस हे प्रकरण वेगळे वळण घेत आहे.
आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सरकारने तपासासाठी SIT ची स्थापना केली आहे. पण आता या SIT मधून तीन अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. एपीआय महेश विघ्ने (Mahesh Vighne), हवलादार मनोज वाघ (Manoj Wagh) आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून काढले आहे. या अधिकाऱ्यांचा वाल्मिक कराड (Walmik Karad) सोबतचा फोटो व्हायरल झाला होता.
हाच फोटो आता त्यांच्या अंगलट आला आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत तपास निष्पक्षपणे होणार नाही, असा आरोप केला होता. अखेर या तिन्ही अधिकाऱ्यांना SIT मधून हटवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Santosh Deshmukh case
पण अजूनही आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. या आरोपीला आज रात्रीपर्यंत पकडू असा स्थानिक गुन्हे शाखेकडून दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा वाल्मिक कराड हाच मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :