Share

“महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण…”; Sujay Vikhe यांचं वादग्रस्त विधान

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) पाटील यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या मोफत भोजनाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Published On: 

"महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण..."; Sujay Vikhe यांचं वादग्रस्त विधान

Sujay Vikhe । राज्यातील राजकारणात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु असतानाच यात आता अजून एक भर पडली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) पाटील यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या मोफत भोजनाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे .

प्रसादालयामध्ये मोफत भोजन दिलं जातं. मात्र, आता साई संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारे मोफत जेवण बंद करा आणि जेवणासाठी २५ रुपये घेतले पाहिजेत, अशी मागणी सुजय विखे ( Sujay Vikhe ) पाटील यांनी केली आहे.

मात्र हि मागणी करत असताना त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले, “शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देतात. मात्र यामुळे शिर्डीत भिकार्‍यांची संख्या वाढली असून मोफत जेवण बंद करावं आणि  मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही