Share

“….तर त्याला Suresh Dhas जबाबदार”; Amol Mitkari स्पष्टच बोलले

"....तर त्याला Suresh Dhas जबाबदार"; Amol Mitkari स्पष्टच बोलले

Amol Mitkari । सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ( Santosh Deshmukh Murder case ) उर्वरित आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी काल परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणं केली.

भाजपा आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनीही या सभेत तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. धनंजय मुंडेंसह त्यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनाही चांगलाच टोला लगावला. यावरून आता महायुतीतील नेत्यांमध्ये असलेला वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे (Ajit Pawar NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाष्य केलंय.

महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील, असं विधान आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यावरही सुरेश धस कसे बोलतायेत?, असा सवालही त्यांनी यावेळी केलाय.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लागला पाहिजे. त्यांना मोका लागला म्हणजे, चार पाच वर्ष ते काही बाहेर येत नाही. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले. “अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले?”, असा सवाल करत सुरेश धस यांनी मुंडेंसह अजित पवारांनाही लक्ष्य केलं.

महत्वाच्या बातम्या :

महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील, असं विधान आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now