Gunratna Sadavarte । संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार 3 आरोपींपैकी पोलिसांना 2 आरोपींना पकडण्यात यश आले आहे. तर 1 आरोपी अजूनही फरार आहे. डॉ. संभाजी वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला होता.
देशमुख कुटुंबाला त्रास झाला आणि धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी दिला होता. आता यावरून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “पावशेर दारू पिऊन जर कोणी धनजय मुंडे यांना अपमानित करण्याचे धाडस दाखवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. तुमच्या बापाचे रस्ते आहे का बे? शेतीला शेत असेल तरी वाट द्यावी लागते. जरांगे तुझं काय शिक्षण आहे? जरांगे, धस कोणीबी असो. मृत टाळूवरचं लोणी खात आहेत.”
जरांगे यांच्यावर टीका करत असतानाच सदावर्ते यांनी सुरेश धस यांच्यावर देखील निशाणा साधला. जरांगे आणि धस सुपारीबाज असल्याचं सदावर्ते म्हणाले. “मातमच्या जागी तुम्ही शिमग्यासारखं वागत आहात. धस आपण वैयक्तिक आयुष्यावर बोलू नये. आम्ही धस आणि पावशेरचे चालू देणार नाही”, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.
महत्वाच्या बातम्या :