Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून सातत्याने भाजप आमदार सुरेश धस हे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर गंभीर करत आरोप त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे.
14 जूनपूर्वी वाल्मिक कराड आणि नितीन बिक्कड यांची ओळख झाली. 14 जूनला कराड, बिक्कड आणि अनंत काळकुट्टे यांची परळीतील धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली होती. तसेच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला घेऊन बिक्कड परळीला वाल्मिक कराड (Walmik Karad) कडे गेला. त्याच वेळी मुंडेंचे जोशी नावाचे पीएमार्फत ते थेट धनंजय मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करत होते.
त्यानंतर म्हणजे 19 जूनला मुंडेंच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी, शुक्ला, वाल्मिक कराड, बिक्कड यांच्यात बैठक पार पडली. बैठकीत 3 कोटी आकाने मागितले. त्यानंतर अल्ताफ तांबळी आणि शुक्लाने कंपनीच्या वरिष्ठांना फोन करून कंपनीने तीन कोटींऐवजी दोन कोटींमध्ये व्यवहार करु, असं सांगितलं.
Suresh Dhas vs Dhanjay Munde
पुढे ते म्हणाले की, “बैठकीत पैशांबाबत नेमकं ठरलं नाही. मग कंपनीकडे निवडणुकीसाठी काहीतरी रक्कम मागितली. त्यावेळी 50 लाख रुपये घेतले. तसेच कृष्णा कुटे या नावाच्या ओम साईराम नावाच्या कंपनीला मस्साजोगच्या सेक्युरिटीचं काम दिलं. तो चालवतो नितीन बिक्कड. यावेळी काळकुटे बंगल्यावर नव्हता”, असं सुरेश धस यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या :