Devendra Fadnavis । सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याने राज्यात खूप मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, “चांगल्या आणि लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होणं हे खूप मोठं दुर्दैव आहे. परंतु या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग होऊ नये. या घटनेतून सुधारणा व्हावी, असा उद्देश आहे.”
पुढे ते म्हणाले की आरोपी कुठे गेले असतील आणि कुणी त्यांना मदत केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होत आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाहीत. यासंदर्भात नीट चौकशी करु द्या, सगळी चौकशी करु होऊ द्या,” असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
Devendra Fadnavis on Santosh Deshmukh case Investigation
बीडच्या प्रकरणात सरकार आणि पोलिसांची कारवाई सुरु आहे. काहीही झालं तरी कोणाला वाचवलं जाणार नाही. जर कुणी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना वाचवलं जाणार नाही. जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोकं दादागिरी करतात, हप्ते वसुली करतात. या सगळ्यांवर जरब बसवला जाईल,” असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :