Santosh Deshmukh । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. राज्यात ठिकठिकाणी आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मोर्चे काढले जात आहेत. शिवाय या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ देखील चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. (Santosh Deshmukh Case)
याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हत्येनंतर सुदर्शन घुले याने रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीचा फोन वापरून युट्यूबवर देशमुख हत्येची बातमी पाहिली आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांनी गुजरातमधील मंदिरात लपून बसण्याचा निर्णय घेतला.
15 दिवस तिथेच त्यांनी मुक्काम केला. धक्कादायक बाब म्हणजे पैसे आणि अन्नाची व्यवस्था मंदिरातूनच होत होती. घुले याच्याकडील पैसे संपल्याने आंधळे 3 जानेवारीला पैसे घेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला. पण तो माघारी जाण्यापूर्वी घुले आणि सांगळे पुण्याकडे रवाना झाले. त्यांनी पुण्यातील एका व्यक्तीकडे आर्थिक मदतीसाठी जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
Santosh Deshmukh Case Update
दरम्यान, या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :