Manoj Jarange । एकीकडे मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली तर दुसरीकडे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. पुण्यात आज लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“जर धनंजय मुंडे मराठा समाजावर आरोप करत असतील, तर आम्ही देखील जरूर त्याला प्रतिउत्तर देऊ. जर तुम्ही मोर्चे काढले, तर आम्ही देखील मोर्चे काढू. त्यामुळे धनंजय मुंडे वेळीच शहाणा हो, आम्ही आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुला साथ दिली, त्यांच्यावरच पलटण्याचा प्रयत्न करू नकोस,” असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. ” देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिलेला शब्द मराठा समाजाने मानला आहे, पण जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला, तर मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. आम्ही कधीच कोणाच्या जातीवर टीका केली नाही. पण सध्या जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने यावर तातडीने कारवाई करावी. नाहीतर मराठा समाज राज्यभर आंदोलन करेल.”
महत्त्वाच्या बातम्या :