Share

“धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सूचनेवरूनच…” Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा

Thackeray group leader and MP Sanjay Raut has made a demand. This has created a lot of excitement in the political circles.

by MHD

Published On: 

"धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सूचनेवरूनच...'' Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut । मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. पोलीस चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Santosh Deshmukh murder case)

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास निष्पक्ष पद्धतीने केला जात नाही. बीडमधील संपूर्ण पोलीस खात्यातील नेमणुका मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आणि वाल्मिक कराड यांच्या सूचनेवरून झाल्या असल्याने तिथले संपूर्ण पोलीस खातं बरखास्त कराव्यात आणि नव्याने तिथे नेमणुका करून तपास व्हायला हवा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

सध्या बीडमध्ये नवीन पोलीस प्रमुख आणले आहेत. मला त्यांच्याविषयी काहीच बोलायचे नाही. पण, त्यानंतर खालच्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांची नेमणूक केलीय हे त्यांचेच कार्यकर्ते खाकी वर्दीत असल्याने पोलीस आता या प्रकरणाचा काय तपास करणार? असा परखड सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut on Santosh Deshmukh murder

दरम्यान, संतोष देशमुख खून प्रकरणामधील आरोपींकडून पोलीस कसून चौकशी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. आज पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही