Walmik Karad । संतोष देशमुख खून प्रकरणामधील आरोपींकडून पोलीस कसून चौकशी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. आज पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशमुख यांच्या कुटुंबियातील सदस्य उपस्थित आहेत. (Santosh Deshmukh murder case)
तुम्हाला संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराडवर संशय आहे का? असा सवाल धनंजय देशमुख यांना विचारला असता त्यावर उत्तर देत ते म्हणाले की, “तुम्हाला याचं उत्तर तीन डिपार्टमेंटकडून मिळेल. याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. याप्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी, बीड पोलिस करीत आहेत. लवकरच तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळेल.”
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली होती. कोर्टाकडून या दोन्ही आरोपींना पंधरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dhananjay Deshmukh on Walmik Karad
तसेच पोलिसांनी आरोपींचा फोन जप्त केला आहे. फोनमध्ये अधिक तपास केला असता जप्त केलेल्या फोनमध्ये देशमुख यांना मारहाण केली असल्याच्या व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :