Share

Manoj Jarange Patil यांच्या डोक्यात फरक पडलाय त्यांच्याकडे…” भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Manoj Jarange Patil head has changed. Minister of State Ashish Jaiswal has made a venomous criticism that no one should pay attention to his speech as he is frustrated.

by MHD

Published On: 

Manoj Jarange Patil यांच्या डोक्यात फरक पडलाय त्यांच्याकडे…" भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Manoj Jarange Patil । उद्या पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने मराठा बांधवांना जमण्याचे आवाहन केलं आहे. जर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या केसाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अशातच आता भाजपच्या मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य त्या दिशेने सुरु असून कायदा आपले काम करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याआधी स्पष्टीकरण दिले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यात फरक पडला आहे. ते वैफल्यग्रस्त झाले असल्याने त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, अशी जहरी टीका राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे.

आशिष जयस्वाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटू शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आता या प्रकरणी मनोज जरांगे प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Ashish Jaiswal on Manoj Jarange Patil

दरम्यान, मराठा समाजाने यापूर्वीही बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चा काढला होता. आज परभणीत मोर्चा काढला. यावेळी अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी आक्रमक पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला आहे. पुण्यात आरोपींना कोणी सांभाळले? गंभीर गुन्ह्यातील सगळ्या आरोपींना पुण्यातूनच का अटक होते? या आरोपींची नार्को टेस्ट व्हायला हवी,” अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही