“अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”; ‘त्या’ फोटोवरून Bajrang Sonawane संतापले 

“आमचे फोटो हे लोकांबरोबरचे आहेत. मात्र, तुमचे फोटो कुठले-कुठले असतील, ते देखील मिळतील. आता मला त्या विषयात जायचं नाही”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनावणे ( Bajrang Sonawane यांनी दिलीय.

Published On: 

“अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल"; 'त्या' फोटोवरून Bajrang Sonawane संतापले 

Bajrang Sonawane | संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडीला शरण गेला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्यासह सुधीर सांगळेला (Sudhir Sangle) पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी एक ट्वीट करत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांना डिवचलं आहे. अमोल मिटकरींनी जो फोटो शेअर केला त्यामध्ये बजरंग सोनावणे यांच्यासोबत वाल्मिक कराड बसल्याचे पाहायला मिळत आहे.

यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल, असा इशारा दिला आहे. “आमचे फोटो हे लोकांबरोबरचे आहेत. मात्र, तुमचे फोटो कुठले-कुठले असतील, ते देखील मिळतील. आता मला त्या विषयात जायचं नाही”, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी अमोल मिटकरी यांना थोडं आवरावं. अजित पवार यांच्यावर आमचं प्रेम आहे. पण, अमोल मिटकरी त्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का?”, असा सवाल खासदार सोनवणे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही