अजितदादांच्या पहिल्या स्मृतिदिनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण व्हावे: अमोल मिटकरी

अजितदादांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलिनीकरण व्हावे, असे मत माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मांडले आहे.

Published On: 

Amol Mitkari demanding CBI inquiry in Ajit Pawar death case

अकोला, 11 नोव्हेंबर: अजित पवारांच्या आगामी पहिल्या स्मृतिदिनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण व्हावे, अशी इच्छा राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. अकोल्यात ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली. गेल्या काही काळापासून मिटकरी यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत सातत्याने चौकशीची मागणी लावून धरली आहे.

येत्या २८ जानेवारीला अजित पवारांचा पहिला स्मृतिदिन असून त्याआधीच दादांच्या एकत्रीकरणाचे स्वप्न पूर्ण व्हावे, असे मिटकरी म्हणाले. तसेच, महाराष्ट्राला लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल असे सांगत, “आगे आगे देखीये, होता है क्या” असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. विलिनीकरणाच्या कोणत्याही निर्णयावर संपूर्ण पक्ष सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा वहिनी जे ठरवतील तेच पक्षाचे धोरण असेल आणि ‘त्या बांधतील तेच तोरण’ अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही ते म्हणाले.

राज्यामध्ये सध्या पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाजूने विलिनीकरणाची चर्चा संपुष्टात आल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, शरद पवारांसोबतच्या अलीकडील भेटीगाठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा नव्याने वेग आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार फुटणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. या दाव्याची खिल्ली उडवत अमोल मिटकरी यांनी राऊतांवर पलटवार केला. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही